
Mumbai Shocker: नुकतेच मुंबईतील (Mumbai) गिरगावात (Girgaon) लिव्ह-इन पार्टनरच्या अॅसिड हल्ल्यात (Acid Attack) जखमी झालेल्या 54 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिलेला रुग्णालयात नेले तेव्हा ती 50 टक्के भाजली होती. ही घटना गेल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात घडली होती. 62 वर्षीय महेश पुजारी याने महिलेवर अॅसिड हल्ला केला होता आणि या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली होती.
महेश पुजारी (62) याने त्यांच्या 54 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरवर दोघांमधील वादातून अॅसिडने हल्ला केला होता. मुंबई पोलिसांनी सांगितले की, दोघेही गेल्या 25 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, अलीकडच्या काळात दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. महिलाही महेशवर घराबाहेर राहण्यासाठी दबाव टाकत होती. त्याला घराबाहेर राहण्यास भाग पाडत होती. कदाचित याच कारणामुळे महेशने मृतावर अॅसिड हल्ला केला. (हेही वाचा -Maharashtra Shocker: आंबोली घाटात मित्राचा मृतदेह टाकण्यासाठी गेला आणि दरी पडून त्याचाच मृत्यू झाला; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या)
पोलिसांनी पुढे सांगितले की, महेशला एलटी मार्ग पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती. आता आरोपीवर महिलेच्या हत्येसाठी भारतीय दंड संहितेचे (आयपीसी) कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.