Punjab Borewell Accident: होशियारपूरमध्ये 6 वर्षाचा चिमुरडा पडला बोअरवेलमध्ये; NDRF च्या टीमला मदतकार्यासाठी पाचारण
6-year-old boy falls in borewell in Hoshiarpur (PC - ANI)

Punjab Borewell Accident: पंजाबमधील होरियारपूर (Hoshiarpur) मधील बैरामपूर गावात सहा वर्षांचा मुलगा बोअरवेल (Borewell) मध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. मूल बोअरवेलमध्ये पडल्यानंतर एनडीआरएफच्या टीमला (NDRF Team) तातडीने पाचारण करण्यात आले आहे. सध्या मुलांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. होशियारपूरचे डीएसपी गोपाल सिंह म्हणाले की, मुलाला वाचवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. याशिवाय वैद्यकीय पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र, मुलगा बोअरवेलमध्ये कसा पडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यानंतर शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले. घटनास्थळाची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. ज्यात पोलीस आणि एनडीआरएफचे जवान मुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव कार्यात गुंतले आहेत. (हेही वाचा - Shocking! महिलेचे अपहरण करून मागितली खंडणी; पती रक्कम देऊ न शकल्याने नराधमांनी पीडितेवर केला सामूहिक बलात्कार)

बोअरवेलमध्ये कॅमेरा लावून मुलाची स्थिती निश्चित करण्यात आली आहे. तो सध्या बेशुद्ध दिसत आहे. त्याच्या सुटकेसाठी लष्कराच्या विशेष पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. 6 वर्षीय मजुराचा मुलगा कुत्र्याच्या भीतीने बोअरवेलवर चढला आणि आत पडला.

अपघाताच्या वेळी मुलाचे आई-वडील बिमला देवी आणि राजिंदर हे शेतात काम करत होते. यादरम्यान एक मोकाट कुत्रा मुलाच्या मागे धावला. बचावण्यासाठी हा मुलगा जवळच्या बोअरवेलच्या पाईपवर चढला. ते जमिनीपासून 3 फूट उंच होते. आतापर्यंत हा चिमुरडा बोअरवेलमध्ये 100 फूट खाली अडकला आहे. त्याला वाचवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकांच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.