Rajasthan Road Accident: राजस्थानच्या जयपूरमध्ये भीषण अपघात, REET 2021 परीक्षा देण्यासाठी जाणारे 6 उमेदवार जागीच ठार
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

राजस्थानच्य (Rajasthan) जयपूरच्या (Jaipur) चाकसू (Chaksu) परिसरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात शिक्षक पात्रता (REET) परीक्षा देण्यासाठी निघालेल्या 6 उमेदवारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 5 जण जखमी झाले आहेत. चाकसू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमोडिया कटजवळ आज (25 सप्टेंबर) सकाळी हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इको व्हॅन मधून विद्यार्थ्यांसह एकूण 11 जण बारनहून सीकरला जात होते. मात्र, चाकसू पोलीस स्टेशन परिसरातील निमोडिया कट जवळ महामार्गावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पाठीमागून ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात 6 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, 5 जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी मृतदेह राज्य रुग्णालयाच्या शवगृहात ठेवले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- Bihar News: बिहारमध्ये मजुरीवर काम करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यावर आले 9.99 कोटी रुपये

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ट्वीट-

या घटेनेवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दु:ख व्यक्त केले आहे. चाकसू येथील रस्ता अपघाता प्राण गमवलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी देवाकडे प्राथना करतो. तसेच मृतांच्या नातेवाईंकांना 2 लाख आणि जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत केली जाणार, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.