Border Security Force Raising Day: देशात 54 व्या BSF स्थापना दिवसाचा उत्साह !
Border Security Force Raising Day (Photo Credits- Twitter)

Border Security Force Raising Day : जगातील सगळ्यात मोठी पॅरा मिलिटरी फोर्स म्हणून ओळख असलेल्या BSF चा आज 54 वा स्थापना दिवस (Border Security Force Raising Day) आहे. देशभरात या दिवसानिमित्त देशाच्या सुरक्षा जवानांना शुभेच्छा दिल्या जात आहे. सीमा सुरक्षा बळ त्यांच्या गौरवशाली इतिहासाची 53 वर्ष पूर्ण करून नव्या वर्षात पुन्हा नव्या दमाने प्रवेश करत आहेत. BSF ची स्थापना  1 डिसेंबर 1965 ला झाली. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर लक्ष ठेवण्याचं प्रमुख काम जवान करतात.

आज उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खास ट्विटच्या माध्यमातून BSF च्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या कठोर मेहनत, परिश्रमाला नायडू यांनी सलाम केला आहे.

आंतर राष्ट्रीय सीमांवर लक्ष ठेवणं, शत्रूंच्या कुरघोडी हाणून पाडणं, देशाचं सीमांवर रक्षण करणं हे काम BSF चे जवान दिवस रात्र करत असतात. सध्या BSF च्या 188 बटालियन असून त्या 6,385.36 किलोमीटर लांबीच्या अंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षा सांभाळण्याचं काम दिवस रात्र करत असतात.