COVID-19 Vaccines | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतात कोरोना लसीकरणाचे (India Corona vaccination) डोस 50 कोटींच्या पुढे गेले आहे. भारताला 50 कोटींपेक्षा जास्त डोस (Dose) देण्यासाठी 203 दिवस लागले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) म्हणण्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी 7 पर्यंत 50 लाख 3 लाख 48 हजार 866 डोस देण्यात आले आहेत. ज्यात 38 कोटी 94 लाख 75 हजार 520 ला पहिला डोस देण्यात आला आहे. तर 11 कोटी 8 लाख 73 हजार 346 लोकांना दोन्ही डोस दिले.  0-10 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी 85 दिवस लागले आहेत. 10-20 कोटी मध्ये 45 दिवस लागले. यानंतर, 20-30 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी 29 दिवस लागले आहे. 30-40 कोटींमध्ये 24 दिवस लागले. तर 50 कोटी लसीकरणाला फक्त 20 दिवस लागले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत दिवसभरात 43 लाख 29 हजार 673 डोस दिले गेले. त्यापैकी 32 लाख 10 हजार 613 पहिला डोस देण्यात आला. 11 लाख 19 हजार 60 लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 1 कोटी 3 लाख 28 हजार 503 आरोग्यसेवकांना पहिला डोस आधीच मिळाला आहे. दोन्ही डोस 79,51,876 आरोग्यसेवकांना दिले गेले आहेत. पहिल्या डोससाठी 1 कोटी 80 लाख 48 हजार 937 फ्रंटलाईन कामगारांनी घेतला आहे. 1 कोटी 16 लाख 50 हजार 548 आरोग्यसेवकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

18 ते 44 वयोगटात 17 कोटी 23 लाख 20 हजार 394 लोकांना पहिला डोस मिळाला आहे. त्याच वेळी 1 कोटी 12 लाख 56 हजार 317 लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. 45 ते 59 वयोगटात 11,07,66,863 लोकांना पहिले आणि 4,19,23,920 डोस दोन्ही मिळाले आहेत. 60 वर्षांवरील 7,80,10,823 लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तसेच 3,80,90,685 लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांनी 18-44 वयोगटातील कोरोना लसीचे 1 कोटीहून अधिक लस डोस दिले आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांनी 18 ते 44 वर्ष वयोगटातील 10 लाखांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लसीकरण मोहिमेचा हा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले की, त्यांचे सरकार सर्वांसाठी लस मोफत लस अंतर्गत सर्व नागरिकांचे लसीकरण करेल. देशात कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू झाले. प्रथम हे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन कामगारांचाही यात समावेश होता. 1 मार्च पासून 60 वर्षांवरील सर्व लोक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण उघडले गेले. यानंतर 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील सर्व लोकांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यानंतर एक महिन्यानंतर 1 मे पासून देशातील 18 वर्षांवरील सर्व लोकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले.