DGCA Imposes Fine: IndiGo Airlines ला 5 लाखांचा दंड; रांची विमानतळावर दिव्यांग मुलाला चढण्यास दिला होता नकार
IndiGo Aircraft | Representational Image (Photo Credits: ANI)

DGCA Imposes Fine: दिव्यांग व्यक्तीला विमानात बसण्यास नकार दिल्याबद्दल एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने इंडिगो एअरलाइन्सवर (IndiGo Airlines) मोठी कारवाई केली आहे. डीजीसीएने कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इंडिगोने 7 मे रोजी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले होते. यावर कडक कारवाई करत DGCA ने कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

डीजीसीएनेही या घटनेबाबत कंपनीला फटकारले आहे. रेग्युलेटर म्हणाले, कंपनीचे ग्राउंड स्टाफ एका अपंग मुलाला नीट हाताळू शकले नाहीत. उलट त्यांनी परिस्थिती आणखी बिघडवली. या प्रकरणात त्याला अधिक संवेदनशीलपणे वागावे लागले. मुलासाठी प्रक्रिया सुलभ झाली असती आणि त्याला शांत केले असते. परंतु, कंपनीचे कर्मचारी हे करू शकले नाहीत. उलट टोकाचे पाऊल उचलत शेवटी प्रवाशाला विमानात बसण्यास नकार दिला गेला. (हेही वाचा - Axis Bank Service Charges Hikes: अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; 1 जूनपासून मिनिमम बॅलेन्ससह 'या' सेवांसाठी द्यावे लागणार जास्त पैसे)

डीजीसीएने पुढे सांगितलं, विशेष परिस्थितीत असामान्य पावले उचलावी लागतील. परंतु, कंपनीचे कर्मचारी नागरी विमान वाहतूक आवश्यकता (नियम) च्या भावना आणि वचनबद्धतेनुसार राहू शकले नाहीत आणि ते यात अयशस्वी झाले. हे पाहता डीजीसीएने कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विमान नियमांच्या तरतुदीनुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे.

इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. स्वस्त उड्डाण सेवा आणि समयसूचकता ही कंपनीची ओळख आहे. देशांतर्गत विमान वाहतूक बाजारात कंपनीचा वाटा 50% पेक्षा जास्त आहे. त्याच्या ताफ्यात 200 हून अधिक विमाने आहेत. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवर आपली सेवा प्रदान करते.