काश्मीर आणि लडाखच्या (Kashmir And Ladakh) काही भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. काश्मीर-लडाखच्या काही भागात भूकंपामुळे जमीन हादरली. कारगिलमध्येही (Kargil) भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के सायंकाळी 7.02 आणि सायंकाळी 7.08 वाजता जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (Richter scale) 5.3 इतकी मोजली गेली. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर खबरदारी म्हणून लोक घराबाहेर पडले. या काळात खोऱ्यात भीतीचे वातावरणही दिसून आले. यापूर्वी 5 डिसेंबर रोजी दुपारी 2.03 च्या सुमारास उत्तरकाशी आणि टिहरीमध्ये भूकंप झाला होता. टिहरीमध्ये दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. एकदा दीड मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. हेही वाचा विमान प्रवाशांसाठी खुशखबर! SpiceJet फक्त 1,122 रुपयांमध्ये देत आहे विमान प्रवासाची संधी, घ्या जाणुन
भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. आपत्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू तेहरी येथे असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी 24 सप्टेंबरला पिथौरागढमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
An earthquake of magnitude 4.8 occurred today around 7:07 pm in 130km N of Srinagar, Jammu, and Kashmir: National Center for Seismology
— ANI (@ANI) December 27, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी देशात 965 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यात कोणतेही नुकसान झाले नसले तरी. त्याच वेळी, उत्तराखंड भूकंपासाठी अत्यंत संवेदनशील आहे आणि ते झोन 4 आणि 5 मध्ये येते. यासोबतच उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे हलके धक्के जाणवत आहेत.