Suicide | (Photo Credits: Pixabay)

Bengaluru: बेंगळुरू (Bengaluru) मधील एका पॉश हॉटेलच्या 19व्या मजल्यावरून बुधवारी 28 वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, शरण असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांने शनिवारी रेसकोर्स रोड येथील रेनेसान्स हॉटेलमध्ये (Renaissance Hotel) चेक इन केले होते.

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, ही व्यक्ती आत्महत्येपूर्वी काही वेळ बाल्कनीत फेरफटका मारताना दिसला. त्या व्यक्तीने हे टोकाचे पाऊल कशामुळे उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा -Man Beat To Stray Dogs: भटक्या कुत्र्यांना बेदम मारहाण, तरुणावर गुन्हा दाखल, उत्तर प्रदेशातील घटना)

गेल्या वर्षी व्हायरल होत असलेला व्हिडिओ - 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने गेल्या वर्षी बेंगळुरूमधील एका पबमध्ये कोरमंगला इमारतीला लागलेल्या आगीची आठवण करून दिली. इमारतीला आग लागल्यानंतर या व्यक्तीने जीव वाचवण्यासाठी 19व्या मजल्यावरून उडी मारली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.