
Man Beat To Stray Dogs: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरुणाने भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओला पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तरुणाने एका कुत्र्याला नाही तर रस्त्यावर असलेल्या अनेक कुत्र्याला काठीने मारहाण केली आहे. (हेही वाचा- रिक्षावर डान्स करणाना तोल गेला, नशीबाने थोडक्यात बचावला
व्हिडिओ दिसल्याप्रमाणे, एक तरुण हातात काठी घेऊन कुत्र्याचा पाठलाग करत आहे. त्यानंतर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना मारहाण करत आहे. ही घटना 5 एप्रिल रोजी घडली आहे. ही घटना रोहता रोड नंन विहार परिसरात घडली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आदित्य आहे. एकाने हा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला जात आहे. एकाने लिहलं आहे की, या तरुणावर कारवाई झाली पाहिजे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील पोलिसांना या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
रस्त्यावरच्या कुत्र्यांनी भुकल्याच्या रागातून त्यांनी बेदम मारहाण केली.या घटनेनंतर शनिवारी परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे या बेदम मारहाणीत एका कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतप्त रहिवाश्यांनी या घनटेची माहिती पीपल फॉर अॅनिमल्सच्या इंदूर युनिटचे अध्यक्ष प्रियांशू जैन यांना दिली. मारहाण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.