फोटो सौजन्य - PTI
गुरुग्राममध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राची चारचौघात मस्करी केली. या कारणावरुन मित्राच्या दोन महिन्याच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. तर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मनजित राम आणि किशोर हे दोघे जीवलग मित्र होते. गुरुवारी रात्री हे दोघे मित्र त्यांच्या अजून काही मित्र मंडळींसोबत बाहेर जेवण्यास गेले. त्यावेळी किशोरने मनजितचा सर्व मित्रांच्या समोर अपमान केला. या रागाने मनजितने किशोरचा काटा काढण्याचे ठरविले. या प्रकरणी मनजितने त्याच्या दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन हत्या केली आहे.
या अपहरण प्रकरणी किशोरने पोलिसात मनजित विरुद्ध तक्रार केली. त्यावेळी मनजितची कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच हत्या केल्याचे कबुल केले आहे.