Delivery Boy Committed Suicide: प्रेयसीने आई-वडिलांना सोडून जाण्यास भाग पाडल्याने 22 वर्षीय डिलिव्हरी बॉयची आत्महत्या
Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Delivery Boy Committed Suicide: बाणगंगा पोलीस ठाण्याच्या (Banganga Police Station) हद्दीतील एका 22 वर्षीय डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) ने गुरुवारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याने त्याच्या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु, प्रेयसीने त्याला आई-वडिलांपासून दूर जाण्यास भाग पाडल्याने त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी तिला हाकलून दिल्यानंतर ती 22 वर्षीय डिलिव्हरी बॉयसोबत राहत होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कुटुंबीयांचे जबाब नोंदवत आहेत. सचिन उर्फ कमल झाला असे मृताचे नाव असून तो भवानी नगर येथील रहिवासी होता. सचिन डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: शाळेत जाण्यास नकार दिल्याने आईने मुलीला फटकारले; 13 वर्षीय मुलीची चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या)

सचिनचे वडील गोविंद यांनी आरोप केला आहे की, गेल्या महिनाभरापासून त्यांच्या घरी राहणाऱ्या मैत्रिणीसोबत झालेल्या वादातून सचिनने आत्महत्या केली. त्यांनी कोर्ट मॅरेज करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कुटुंबीयांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामुळे लग्नास प्रतिबंध घालण्यात आला.

दरम्यान, सचिनची गर्लफ्रेंड त्याच कॉलनीत राहत होती. प्रेमप्रकरण समजल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला या घटनेनंतर हाकलून दिले होते. गेल्या महिनाभरापासून ती सचिनच्या घरी राहू लागली. आई-वडिलांना सोडून दुसरीकडे राहण्यासाठी ती त्याच्यावर दबाव टाकत होती. (हेही वाचा - - Kerala Doctor Dies By Suicide: हुंड्यात मागितली BMW कार आणि 15 एकर जमीन; लग्न मोडल्याने केरळच्या महिला डॉक्टरची आत्महत्या)

या वादामुळे सचिन काही दिवस तणावात होता. त्याला एक बहीण होती जिचे राजस्थानमध्ये लग्न झाले आहे आणि तो त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.