डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास बंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमी मुंबई महानगर पालिकेचा निर्णय ; 20 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Nov 20, 2020 11:54 PM IST
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 2 तर शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. 1 डिसेंबर रोजी राज्य विधानपरिषदेच्या मतदारसंघांमधील द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडेल.
जम्मू-काश्मीर मधील नगरोटा येथील बन टोल प्लाझाजवळ काल झालेल्या चकमकीनंतर कात्रातील वैष्णोदेवी तीर्थस्थानाजवळ सुरक्षा कडक करण्यात आली होती. यात चार दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत.
राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहेच. पण त्याचबरोबर इतर अनेकही प्रश्न आहेत. वाढीव वीज बिलावरुन सध्या राजकारण रंगत आहे. वाढीव वीज बिलात सवलत दिली जाणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. वीज बिलात सवलत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री विशेष बैठक घेऊन याबाबत पुर्नविचार करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोविड-19 संकटामुळे ग्रासल्याने सर्वांचे लक्ष लसीच्या विकासाकडे लागले आहे. परंतु, लस भारतामध्ये पुढील 4 महिन्यांत तयार असेल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे.