Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus: केरळमध्ये (Kerala) आज 20 नवीन रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 202 वर पोहचली आहे. यातील 18 जणांनी प्रवास केला होता. तसेच 2 रुग्णांचा संपर्क कोरोना बाधित रुग्णांशी आला होता. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 4 जणांची कोरोना टेस्ट आज निगेटिव्ह आली आहे. केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 900 हून अधिक झाली आहे. तसेच देशात 20 पेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यातील सुमारे 80 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘केरळ पॅटर्न’ सर्व देशाला मार्गदर्शक ठरत आहे. केरळ सरकार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील वंचित घटकांना अन्न व औषधांची टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी केरळ सरकार घेत आहे. (हेही वाचा - Lockdown In India: भारतीय रेल्वे लॉकडाऊन दरम्यान दुग्धजन्य पदार्थ, वैद्यकीय उपकरणे, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वे गाड्या चालवणार)

दरम्यान लॉकडाऊन काळात केरळ सरकार जनतेला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. केरळमध्ये गोर-गरिबांसाठी केवळ 20 रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी राज्यात 1 हजार कॅन्टीन सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींसाठीदेखील जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत. केरळ सरकारने नागरिकांसाठी 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.