2 SUVs With Same Number Found In Delhi: दिल्लीतील ल्युटियन्समध्ये एकाच क्रमांकाच्या 2 एसयूव्ही आढळल्या; काय आहे प्रकरण? वाचा
Delhi Police Car प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

2 SUVs With Same Number Found In Delhi: देशाच्या राजधानीत पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून काही पावलांच्या अंतरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील गंभीर हलगर्जीपणा पाहायला मिळाला. ज्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले. वास्तविक, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था देशातील इतर शहरांच्या तुलनेत खूपच मजबूत आणि कडक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर तेथील सुरक्षेतील कडकपणा अनेक पटींनी वाढतो. परंतु, ताजी घटना अशी आहे की त्यामुळे लुटियन्स (Lutyens) मधील सुरक्षेचा पर्दाफाश झाला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळील एका पार्किंगमध्ये म्हणजे 7 लोककल्याण मार्गापासून तुघलक मार्गापर्यंत, म्हणजेच पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर जे काही दिसले, त्यामुळे सर्वांची झोप उडाली आहे.

तुघलक रोड परिसरात दोन समान नंबरची एसयूव्ही वाहने -

तुघलक रोड परिसरात एकाच ठिकाणी दोन समान एसयूव्ही उभ्या असल्याची माहिती पीसीआरला मिळाली होती, ज्यांचा नोंदणी क्रमांकही एकच होता. पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून थोड्या अंतरावर एकाच नंबर प्लेटच्या दोन इनोव्हा क्रिस्टा गाड्या उभ्या असलेल्या दिसल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर पोलीस अधिकारी आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन्ही एसयूव्हीला घेरले. सर्व सुरक्षा व्यवस्थेदरम्यान दोन्ही एसयूव्ही वाहनांची झडती घेण्यात आली. आणि या गाड्यांमध्ये भविष्यात त्रास होऊ शकेल अशी कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

एसयूव्हीचा शोध घेतल्यानंतर पोलिसांची दुसरी डोकेदुखी वाढली. कारण दोन्ही इनोव्हा क्रिस्टा कारचा नोंदणी क्रमांक HR87J3289 होता. एका वाहनाची नंबर प्लेट मूळ होती. हाच क्रमांक दुसऱ्या वाहनावरही लावण्यात आला. तपासाअंती सिल्व्हर मेटॅलिक रंगाच्या वाहनाचा तपशील बरोबर असल्याचे आढळून आले, परंतु दुसऱ्या वाहनाचे इंजिन व चेसीस क्रमांक त्याच्या नोंदणी क्रमांकापेक्षा वेगळा होता. पांढऱ्या रंगाच्या इनोव्हाचा मूळ क्रमांक HR38AD9391 असल्याचे आढळून आले.

गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाने गाडी सोडून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत या वाहनांवर हक्क सांगण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. व्हीव्हीआयपी परिसरात अशा बेबंद अवस्थेत वाहन पार्क केल्याबद्दल सर्वप्रथम पोलिसांनीच एफआयआर नोंदवला. अज्ञाताविरोधात कलम 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांकडून तपास सुरू -

ही वाहने याठिकाणी किती दिवसांपासून उभी आहेत व ती कोणी पार्क केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पोलिसांची डोकेदुखी दूर होणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे आता पोलीस संपूर्ण रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून तेथे वाहने कोणी पार्क केली याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.