तामिळनाडू: बस-ट्रकच्या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी
Tamil Nadu bus accident (Photo Credits: ANI)

तामिळनाडूमधील (Tamil Nadu) तिरुपूर जिल्ह्यातील (Tirupur District) अविनाशी शहराजवळ केरळ राज्य महामंडळाच्या बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 19 जण ठार झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाचादेखील मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांमध्ये 14 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बसमधून 48 प्रवाशी प्रवास करत होते. ही बस कर्नाटकातील बंगळुरूहून केरळमधील एरर्नाकुलमला जात होती. त्यादरम्यान, हा अपघात झाला. (हेही वाचा - चंद्रपूर: भाविकांच्या वाहनाला अपघात, 6 ठार, 6 जखमी; मूल तालुक्यातील केसलाघाट येथील घटना)

हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला. त्यावेळी बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. बसच्या पुढील बाजूस बसलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. तसेच जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.