Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
36 minutes ago

राजनाथ सिंह उद्या लोकसभेत लडाखमधील सीमा घडामोडीवर विधान करणार ; 14 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या अण्णासाहेब चवरे | Sep 14, 2020 11:52 PM IST
A+
A-
14 Sep, 23:52 (IST)

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या लोकसभेत लडाखमधील सीमा घडामोडीवर विधान करणार आहेत.

14 Sep, 23:35 (IST)

अरुणाचल प्रदेशमध्ये आज 176 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

14 Sep, 23:26 (IST)

सोलापूर, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 3 तासात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

14 Sep, 23:04 (IST)

आसाममध्ये 2,403 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

14 Sep, 22:56 (IST)

पद्दुचेरी येथे कोरोनाचे आणखी 414 रुग्ण आढळले असून 9 जणांचा बळी गेला आहे.

14 Sep, 22:43 (IST)

लद्दाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांना कोरोनाची लागण झाली आहे.

14 Sep, 22:23 (IST)

उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर येथे कोरोनाचे आणखी 138 रुग्ण आढळले आहेत.

14 Sep, 21:38 (IST)

हरियाणामध्ये आज 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 हजार रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

 

14 Sep, 21:17 (IST)

मुंबई शहरामध्ये आज 2,256 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच  31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,71,949 इतकी झाली आहे. सध्या 31,063 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय आतापर्यंत 1,32,349 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 8,178 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.

14 Sep, 20:58 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 17066 रुग्ण आढळले असून 257 जणांचा बळी गेला आहे.

Load More

कोरोना (Coronavirus) नावाच्या विषाणूची एक वात चीनमधील वुहान या शहरातून पेटली आणि तिचा वनवा जगभर पसरला. जगभरातील देश या वनव्यातून जात आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. कोरोना व्हायरस या संकटाशी तोंड देत असलेला भारत, बेरोजगारी, घसरलेली अर्थव्यवस्था वाढती महागाई आणि आरोग्याच्या समस्येशी तोंड देत असतानाच शेजारी राष्ट्र चीन सातत्याने वाद उकरुन काढत असेल. मग मुद्दा लद्दाख, गलवान खोरे असो किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून भारतीयांवर ठेवलेली नजर असो. आताही असाच एक धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. चीन म्हणे हजारो भारतीयांवर हेरगिरी करत आहे. भारतातील अनेक मोठे राजकीय नेते, उद्योगपती आणि हजारो नागरिकांवर चिन आपली नजर ठेऊन आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्र आणि त्याच्या विविध प्रादेशिक भाषांमधून प्रकाशित होत असलेल्या सहकारी वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीन हा एका डिजिटल कंपनीच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाचे भारतीयांवर चीन आपली नजर ठेऊन आहे.

दुसऱ्या बाजूला भारत आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरस संसर्गाच्या छायेत आहेत. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संकट अधिक गडद होत चालले आहे. भारतातील इतर राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दहा लाखांच्या पार गेला आहे. असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून एक भाषण कालच केले. या भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी, जनतेने घाबरण्याचे कारण नाही. कोरोना व्हायरस संकटासोबत लढण्यासाठी राज्य सरकार खंबीर आहे. आरोग्य यंत्रणेत योग्य तो बदल केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे जनतेने जागरुक असावे, नियम अटींचे पालन करुन निश्चिंत राहावे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाव व्हायरस, राजकारण, अर्थकारण, खेळ, उद्योग, कृषी, गुन्हे आणि यांसह विविध क्षेत्रातील ताज्या घटना घडामोडी तपशीलासह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.


Show Full Article Share Now