Karnataka IT Industry Representative Image (Photo Credits; Wikimedia Commons)

Karnataka IT firms Propose 14-hour Workday: कर्नाटकमध्ये आयटीसेक्टर जॉबमध्ये सध्या वातावरण गरम झाल्याचे पहायला मिळत आहे. कारण आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 14 तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारला पाठवला आहे. या प्रस्तावावर कर्मचाऱ्यांकडून संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. 14 तास काम करणे, अमानुष असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आरोग्याच्या समस्या आणि नोकरकपातीचा मुद्दा उपस्थित करत याचा निषेध केला आहे. लवकरच सरकार त्यावर निर्णय घेईल. (हेही वाचा:Wipro Job Hiring: विप्रोमध्ये मोठी नोकर भरती; 10 हजार ते 12 हजार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार )

राज्य सरकार कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट, 1961 मध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे. आयटी कंपन्यांना त्यांच्या प्रस्तावाचा दुरुस्तीमध्ये समावेश करायचा आहे. ज्यामुळे परिणामी कायदेशीररित्या कामाचे तास 14 तासांपर्यंत वाढवले ​​जातील, यामध्ये कामाचे 12 तास आणि 2 तास ओव्हरटाइम अशी शिफ्ट असेल. (हेही वाचा: Tesla Hiring: एलोन मस्कची टेस्ला करणार AI आणि Robotics साठी 800 नवीन कर्मचाऱ्यांची भरती)

आयटी कंपन्यांनी पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, 'IT/ITeS/BPO क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिवसातून 12 तासांपेक्षा जास्त आणि सतत तीन महिन्यांत 125 तासांपेक्षा जास्त काम करण्याची आवश्यकता असल्याने त्यासंदर्भात परवानगी दिली जाऊ शकते.' याबाबत सरकारने प्राथमिक बैठक घेतली असून लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आहे. या प्रस्तावावर मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांकडून तीव्र निषेध

कामाचे तास वाढवल्यास त्याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्यावर होईल. कार्यालयात कर्मचारी संख्या एकाच वेळी जास्त दिसल्यास कदाचित अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येईल. कामाचे तास वाढवल्यास शिफ्टवर परिणाम होईल. कामगारांच्या शिफ्टची संख्या कमी झाल्यामुळे एक तृतीयांश कर्मचारी बेरोजगार होतील. असं निवेदनात म्हटलं आहे.