Rape | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात (Kasganj District) एका 11वीच्या विद्यार्थिनीवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या आरोपीने पीडितेला या घटनेचा व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देऊन तिच्याकडून 8 लाख रुपये उकळले. तरुणीने आरोपीला पैसे दिले. मात्र, नंतर आरोपीने आणखी पैशाची मागणी करत तिचा छळ सुरूच ठेवला.

मुलीने शेवटी तिच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने कासगंज जिल्ह्यातील कोतवाली सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील स्थानिक व्यापारी असून आरोपी त्याच परिसरात एका दुकानात काम करतो. (हेही वाचा - Sidhu Moose Wala Murder Case: मुसेवाला हत्येप्रकरणी SIT करणार तपास; आतापर्यंत 2 जणांना अटक)

पोलिस उपअधीक्षक दीप कुमार पंत यांनी सांगितले की, “मुख्य आरोपी, त्याचे आई-वडील, भाऊ आणि एकावर आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार), 120-बी (गुन्हेगारी कट) आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनेनंतर आरोपी आणि त्या परिवार फरार आहे.

पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने डिसेंबर 2021 मध्ये आपल्या मुलीला मित्राच्या घरी नेले. तिला अंमली पदार्थ असलेले कोल्ड ड्रिंकचा ग्लास प्यायला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने गुन्ह्याचे चित्रीकरण केले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. माझ्या मुलीने माझ्या घरातून आणि दुकानातून चोरलेल्या 8 लाख रुपयांमधून आरोपीने 2 लाख रुपयांची बाईक विकत घेतली.

पीडितेने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना तिच्या त्रासाबद्दल कळले. पीडितेच्या वडीलांनी सागितले की, "गेल्या काही दिवसांपासून ती पोटभर जेवण करत नव्हती आणि विचित्र वागत आहे, यावरून आमच्या लक्षात आले की, तिला काहीतरी त्रास होत आहे."