INDvsENG: शाहबाज नदीम आणि राहुल चहर स्टँडबाय खेळाडूंमध्ये- बीसीसीआय; 11 फेब्रुवारी 2021च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Ashwjeet Jagtap
|
Feb 11, 2021 10:57 PM IST
एकीकडे कोरोना अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. तर, दुसरीकडे महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात लसीकरणाची तयारी सुरु असताना गेल्या 24 तासात 3 हजार 451 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7 टक्के झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिलाचा भरणा न करणारे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 14 लाख ग्राहक आहेत. या सर्वाचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दूरचित्र संवादाद्वारे आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय (SEBC) मधील मराठा उमेदवार ईडब्ल्यूएस आरक्षणामधून राज्य ऊर्जा विभागात नोकरीसाठी अर्ज करू शकतात. सध्या नव्याने तयार झालेल्या एसईबीसी कोट्यात मराठ्यांच्या आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, ज्याने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समुदायाला आरक्षण देणार्या 2018 च्या कायद्यावर स्थगिती दिली आहे. आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणामधून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने महावितरणला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.