Year Ender 2019 : बॉलीवूडचे शेहेनशाह बिग बी ते साऊथचा सुपरस्टार महेश बाबू, हे आहेत ट्विटर वर ट्रेंड झालेले Top 10 Men
Amitabh Bachchan, Mahesh Babu (Photo Credits: Twitter)

Top 10 Entertainment Twitter Handles in India (Male): 2019 या वर्षात ट्विटरवर अनेक गोष्टी ट्रेंड झाल्या. बॉलीवूडचे शेहेनशाह बिग बी ते साऊथचा सुपरस्टार महेश बाबू यासारखी मनोरंजन विश्वातील अशी काही नावं आहेत जी या ट्विटर ट्रेंडच्या यादीत अगदी हमखास दिसली, कधी कोणी आपल्या आजारपणामुळे, तर कधी कॉंट्रोव्हर्सीमुळे. ट्विटर इंडियाने आपल्या अधिकृत हँडलवर नुकत्याच शेअर केलेल्या या यादीत बघूया एंटरटेनमेंट विश्वातील कोण होते यावर्षीचे टॉप 10 Men जे ठरले ट्विटरवर हॉट ट्रेंडिंग टॉपिक.

बिग बी म्हणजेच बॉलीवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे अनेक गोष्टींमुळे ट्विटरवर चर्चेत होते. पण त्यातही त्यांचं आजारपण आणि कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवाजी महाराज असा केलेला उल्लेख, या दोन गोष्टींमुळे ते अधिक चर्चेत राहिले. त्यामुळे, ट्विटर ट्रेंड्समध्ये (Twitter Trends 2019) सर्वात आघाडीचं नावही त्यांचंच पाहायला मिळालं आहे.

खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा ट्विटर ट्रेंडच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पाहायला मिळतो. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांमुळे आणि त्याचा नागरिकत्व भारतीय नसल्याने तो अनेकदा ट्विटरवर चर्चेत राहिला आहे. अक्षय कुमार पाठोपाठ बाजी मारली आहे बॉलीवूडचे सुपरस्टार्स सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांनी. सलमानने ट्रेंडच्या या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे तर शाहरुख चौथ्या क्रमांकावर दिसतो.

बॉलीवूडच्या या सुपरस्टार्स ना तंगडी टक्कर दिली आहे साऊथ इंडस्ट्रीतील विजय (Actor Vijay) या अभिनेत्याने. तामिळ इंडस्ट्रीमधील या अभिनेत्याने भारतात ट्विटर ट्रेंडच्या यादीत पटकावलं आहे पाचवं स्थान. त्याच्या बीगील (Bigil Movie) या आगामी चित्रपटासाठी तो ट्रेंड झाला होता.

तर रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अजय देवगण (Ajay Devgn) हे देखील Top 10 Men च्या यादीत पाहायला मिळतात. रणवीर नेहमीच त्यांच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे हॉट गॉसिप टॉपिक ठरतो तर अजय देवगण त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला.

Top Politics Handles In India 2019: ट्विटर वर यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबदबा; स्मृती इराणी, अमित शहा सह ठरले हे 10 प्रभावी राजकारणी मंडळी!

आणखी एक साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात गाजलेलं नाव म्हणजे महेश बाबूचं (Mahesh Babu). तेलगू सिनेमातील या अभिनेत्याने भारतातील Top 10 Men च्या यादीत स्थान पटकावलं आहे.

विजय या तामिळ अभिनेत्यासोबतच एटली कुमार (Atlee Kumar) या तामिळ दिग्दर्शकाचं नाव देखील या वर्षी खूप गाजलेलं पाहायला मिळालं ते म्हणजे त्यांच्या बीगील या चित्रपटामुळेच. त्यामुळे तो ही आहे ट्विटर ट्रेंडच्या Top 10 Men या यादीत दहाव्या क्रमांकावर.