Swwapnil Joshi च्या Birthday निमित्त काय म्हणाली Amruta Khanvilkar; Social Media वर केलं शेयर
Swapnil Joshi & Amruta Khanvilkar | (Picture Courtesy: Helo)

महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार आणि 'चॉकलेट बॉय' अशी ओळख असलेला स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याचा आज वाढदिवस आहे. तरुणींचा चाहता असलेल्या या रोमँटिक हिरोने आज 43 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त त्याच्यावर चाहत्यांकडून तसेच चित्रपटसृष्टीतून शुभेच्छाच्या वर्षाव झाला आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या आहेत.

स्वप्नीलसोबत काम केलेल्या अनेक सहकलाकारांपैकी एक अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)  हिने त्याला वाढदिवसानिमित्त हटके अशा शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताने त्याचे आभार मानले आहेत. कशाबद्दल असा प्रश्न पडला असेल ना? अमृता म्हणते,''माझा 'जिवलगा' झाल्याबद्दल धन्यवाद''.

पाहा Helo App:

Swapnil Joshi & Amruta Khanvilkar

अमृता आणि स्वप्नीलने काही दिवसांपूर्वीच सांगता झालेल्या 'जिवलगा' या मालिकेत सोबत काम केले होते. यात ते एकमेकांचे पती पत्नी झाले होते. स्वप्नीलने निभावलेली खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच अमृताची काहीशी ग्रे शेड मधील भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. तसेच दोघांनी या आधी 2015 साली आलेल्या 'वेलकम ज़िन्दगी' (Welcome Zindagi) या चित्रपटातही सोबत काम केले होते.