अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) हीने 3 ऑगस्टला एका मुलाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर नुकतीच उर्मिलाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने बाळाला जन्म सी सेक्शन द्वारा दिला असल्याचं म्हटलं आहे. याच पोस्ट मध्ये गरोदरपणात स्त्रियांवर असणारं दडपण, नॉर्मल ऐवजी सिझेरियन पद्धतीने झालेली प्रसुती यामुळे अनेकदा स्त्रियांना दोष दिला जातो. पण सीझेरियन देखील नॉर्मल असल्याचं सांगत उर्मिलाने अनेकांची तोंडं बंद केली आहेत.
उर्मिला अभिनेत्री सोबतच युट्युबर देखील आहे. तिच्या युट्युब चॅनल वर ती लाईफस्टाईलशी निगडीत अनेल व्हिडीओ अपडेट करत असते. तिच्या गरोदरपणाच्या काळातही उर्मिलाने या विषयाशी निगडीत अनेक व्हिडिओ केले आहेत. त्यावरूनही 'इतकं कसलं कौतुक?' अशा आशयाच्या मेसेजनेही सोशल मीडीयात उर्मिला ट्रोल झाली होती.
उर्मिलाची पोस्ट
View this post on Instagram
'अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट!' म्हणत उर्मिलाने गरोदरपणाच्या काळात व्यायाम, आहाराची पथ्य पाळून देखील नॉर्मल डिलेव्हरी ऐवजी सीझेरियन पर्याय निवडावा लागला असं सांगितलं आहे. यामध्ये तिने तिच्या आरोग्याशी निगडीत काही कारणं देखील स्पष्टपणे सांगितली आहे.
दरम्यान उर्मिलाच्या या मनमोकळ्या पोस्ट वर कलाक्षेत्रातील इतर अभिनेत्रींकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री अक्षया नाईकने देखील उर्मिला आणि तिच्या बाळाचं कौतुक करत तिने मांडलेल्या भूमिकेचं कौतुक केले आहे.