Tunisha Sharma (PC - Instagram)

Tunisha Sharma Death Case: टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) ने 24 डिसेंबर रोजी तिच्या टीव्ही शोच्या सेटवर मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. तुनिषाच्या मृत्यूनंतर तिच्या आईने सहकलाकार आणि प्रियकर शीझान मोहम्मद खानवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी शीजनला अटक करून न्यायालयात हजर केले. सध्या शीझान खान 28 डिसेंबरपर्यंत कोठडीत राहणार आहे. आता शीजान खानचे वकील रुपेश जैस्वाल यांनी दावा केला आहे की, तुनिषा शर्माने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे, तुनिषाच्या आईने दावा केला आहे की शीजान खानने आपल्या मुलीची फसवणूक करून तिचा 3-4 महिने वापर केला आहे.

ETimes TV ने शीजान खानचे वकील रुपेश जैस्वाल यांच्या हवाल्याने सांगितले की, तुनिषा शर्माने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रुपेश जैस्वाल म्हणाले, "वैद्यकीय अहवालात तुनिषाच्या आईने तिच्या मुलीच्या आधीच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा उल्लेख केला आहे. मी यापलिकडे जास्त काही सांगू शकत नाही." (हेही वाचा  - Tunisha Sharma Mother Video: बॉयफ्रेण्ड शिजानने दिला तुनिषाला धोका, तुनिषा शर्माच्या आईने व्हिडीओ शेअर करत केला मोठा खुलासा)

शीजान खानचे वकील रुपेश जैस्वाल पुढे म्हणाले, “मी या मुद्द्यावर अधिक काही सांगू शकत नाही. कारण ही वस्तुस्थिती देखील तपासाचा विषय आहे. मृत (तुनिषा) मध्ये नैराश्याची लक्षणे होती आणि तिने तिच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल सांगितले होते. हे तपास अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. यात कोणताही धार्मिक अँगल नाही. तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर तुनिषा प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली होती. मात्र, पोलिसांनी गर्भधारणेच्या प्रकरणाचा इन्कार केला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे की, तुनिशा गरोदर नव्हती आणि तिचा मृत्यू फाशीनंतर गुदमरल्यामुळे झाला.

याशिवाय या प्रकरणात लव्ह जिहादचा अँगल असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात 'लव्ह जिहाद'चा कोणताही अँगल नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, तुनिशा आणि शीझानचे ब्रेकअप धर्मामुळे झाले का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. शीजानला तुनिषाचे धर्मांतर करून लग्न करायचे आहे का? हे पोलिसांना जाणून घ्यायचे होते. यासंदर्भात पोलीस शीजनची चौकशी करणार आहेत. वृत्तानुसार, ब्रेकअप कधी झाले आणि त्यामागचे कारण काय होते? या संपूर्ण प्रश्नांचा पोलिस तपास करत आहेत. सध्या वालिव पोलीस ठाण्यात शिजान खान याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.