Munmun Dutta Arrest: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम मुनमुन दत्ताला अटक; 4 तासांनंतर जामिनावर सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Munmun Dutta (PC- Instagram)

Munmun Dutta Arrest: तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम बबिता जी (Babita Ji) उर्फ ​​अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. जातीय टिप्पणी प्रकरणी, अभिनेत्री सोमवारी हंसी, हरियाणा पोलिसांसमोर हजर झाली आणि सुमारे चार तासांच्या चौकशीनंतर तपास अधिकाऱ्यांनी तिची अंतरिम जामिनावर सुटका केली. मात्र, यादरम्यान मुनमुन दत्ताने प्रसारमाध्यमांसोबत कोणताही संवाद साधला नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

13 मे 2021 रोजी मुनमुन दत्ता विरुद्ध एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर मुनमुनने सर्वोच्च न्यायालयात जाऊन या प्रकरणाविरोधात याचिका दाखल केली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर 2021 रोजी ही याचिका फेटाळली. मुनमुनने अनुसूचित जातींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करत यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर हांसीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या व्हिडिओवरून झालेल्या गदारोळानंतर मुनमुनने माफीही मागितली होती. (वाचा - Jhund Teaser: नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूड सिनेमा 'झुंड'चा टीझर प्रदर्शित; Amitabh Bachchan प्रमुख भूमिकेत)

जामिनाची तरतूद नाही -

25 फेब्रुवारीला तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले होते. दरम्यान, तक्रारदार रजत कलसन यांनी सांगितले की, एससी एसटी कायद्यात अंतरिम जामिनाची तरतूद नाही आणि ते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. विशेष म्हणजे मुनमुन दत्ताचा हा वाद चांगलाच तापला होता, मात्र अभिनेत्रीने माफी मागितल्यानंतर तोही शांत झाला.