Bigg Boss OTT 3:  ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरा सिझन रद्द, जाणून घ्या कारण
Bigg Boss (PC - Twitter)

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ संपलं की आता चाहत्यांना ‘बिग बॉस ओटीटी’ची आतुरता असते. 2021 पासून ‘बिग बॉस ओटीटी’ सुरू झालं. आतापर्यंत दोन पर्व यशस्वीरित्या पार पडले. त्यामुळे चाहते ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची वाटत पाहत आहेत. गेल्यावर्षी वादग्रस्त युट्यूबर एल्विश यादवने बिग बॉस ओटीटीची  ट्रॉफी जिंकली होती. यानंतर बिग बॉस ओटीटीचा नवा सिझन कोण जिंकणार तसेच कोण कोण यामध्ये सहभागी होणार याबद्दलची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.  काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व 15 मेपासून सुरू होणार असल्याचं समोर आलं होतं. (हेही वाचा - Sayaji Shinde Health Update: सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी; अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलं तब्येतीसंदर्भात अपडेट (Watch Video))

 

या पर्वाची तारीख समोर आल्यानंतर यामध्ये  कोण-कोण स्पर्धक असणार याची देखील चर्चा सुरू होती. दलजीत कौर, शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, सना सईद, विकी जैन असे अनेकजण ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक असल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र आता एक बातमी या संदर्भात आली आहे. यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द करण्यात आलं आहे. कलर्स टीव्ही व जिओ सिनेमाने ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व न करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू केलं तर त्यानंतर लगेच ‘बिग बॉस’चा 18वं पर्व सुरू होईल. दोन्ही शोमध्ये फारसे अंतर राहणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कंटाळा येऊ शकतो. या कारणामुळे यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.