'रात्रीस खेळ चाले- 2' ही लोकप्रिय मालिका आज घेणार प्रेक्षकांचा निरोप, 31 ऑगस्टपासून सुरु होणार 'ही' नवी मालिका
Ratris Khel Chale 2 And Devmanus (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi)  वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले-2' (Ratris Khel Chale 2) आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज रात्री 10.30 या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. या मालिकेतील अण्णा (माधव अभ्यंकर) आणि शेवंता (अपूर्वा नेमळेकर) ही पात्रांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. त्यातील इतर पात्र माई, छाया, सरिता, दत्ता, पांडू हे देखील लोकांच्या कायम स्मरणात राहतील अशीच आहे. काल (28 ऑगस्ट) ला प्रसारित झालेल्या भागानुसार आज अण्णांचा मुलगा अभिरामचा साखरपुडा होणार आहे. मात्र या मालिकेचा शेवट गोड होतो की कडू हे पाहण्यासाठी सर्वांना आजचा एपिसोड बघावा लागेल.

या मालिकेत शेवंताच्या मृत्यूनंतर सुरु झालेला रात्रीचा खेळ, अण्णांनी ज्यांचे जीव घेतले त्या सर्वांची भूतं अण्णांना त्रास देऊ लागली होती. मात्र माईंनी अण्णांना यातून बाहेर काढले. मात्र म्हणतात या जन्माचे याच जन्मी भोगावे लागते. त्यामुळे अभिरामच्या साखरपुड्यात काहीतरी विघ्न येणार याची चाहूल माईंना लागली आहे. त्यामुळे आज नेमकं काय होणार याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. रात्रीस खेळ चाले 2 मध्ये नाईक वाड्यात वाजणार अण्णा आणि शेवंताच्या लग्नाचे सनई-चौघडे, See Photos

सोमवारपासून म्हणजेच 31 ऑगस्टपासून या मालिकेची जागा 'देवमाणूस' ही सीरियल घेईल. याचे भयभीत करणारे प्रोमोज सध्या झी मराठी वाहिनीनवर दाखवले जात आहे. सत्य घटनेवर आधारित या मालिकेची कथा आहे.