मराठी अभिनेत्री सुरभी हांडे विवाहबद्ध (Photo Credit: Twitter)

'जय मल्हार' (Jai Malhar) या लोकप्रिय मालिकेत म्हाळसा देवी साकारणारी अभिनेत्री सुरभी हांडे (Surbhi Hande) हिचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. दुर्गेश कुलकर्णी या आपल्या मित्रासोबत सुरभीने लग्नगाठ बांधली. ऑगस्ट 2018 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.

विवाहसोहळ्यातील काही क्षण आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सुरभी सध्या 'लक्ष्मी सदैव मंगलम्' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून या मालिकेतील कलाकारांनी विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यांचे फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

सुरभीने साखरपुडाही अगदी गुपचूप साधेपणाने केला होता. त्यानंतर विवाहसोहळाही फारसा गाजावाजा न करता पार पडला. पण याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

सुरभीला लहानपणापासूनच एकांकिका, नाटक, अभिनयाची आवड होती. मालिका, सिनेमात विविध भूमिका साकारत असताना 'जय मल्हार'मधील म्हाळसा या भूमिकेने तिला विशेष ओळख मिळवून दिली.