अभिनयातील उत्तम समज, आवाजातील जरब आणि भेदक नजर या कलागुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात उतरविणारे डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe Birthday) यांचा आज जन्मदिवस. जबरदस्त व्यक्तिमत्व, मराठीवर प्रभुत्व, प्रभावी वक्तृत्व या गुणांमुळे अमोल कोल्हे यांनी न केवळ कला क्षेत्रात नाव कमावले तर आपल्या या हुशारीचा फायदा जनतेला व्हावा यासाठी नेहमी तिरस्कार केल्या जाणा-या राजकीय क्षेत्राकडे वळाले. ज्याचा परिणाम अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आजच्या घडीला खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा हा प्रवास आजच्या युवा पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल असाच आहे.
डॉ. अमोल कोल्हे पदवीधर असूनही अभिनयाची आवड त्यांना या क्षेत्राकडे घेऊन आली. त्यानंतर अनेक नाटकांमधून, मालिकांमधून, चित्रपटांतून त्यांनी आपले अभिनयाचे कौशल्य लोकांसमोर दाखवले. मात्र अभिनयाच्या या कारकिर्दीत त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला तो राजा शिवछत्रपती या मालिकेत साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. या मालिकेने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले आणि खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील संभाजीराजांची भूमिका देखील त्यांनी तितकीच समर्थपणे पेलली आणि लोकांच्या मनावर अधिराज्य केले. मात्र तुम्हाला माहित आहे का अभिनयासोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी कथाबाह्य कार्यक्रमांसाठी निवेदन देखील केले आहे. हेदेखील वाचा- Sansad Ratna Awards 2020: महाराष्ट्रातील अमोल कोल्हे, हिना गावित यांना ‘संसद रत्न 2020’ पुरस्कार जाहीर; सुप्रिया सुळे यांना मिळणार 5 वर्षांत एकदा प्रदान होणारा 'संसद महारत्न पुरस्कार'
आमची शाखा कुठेही नाही, मंडळ भारी आहे, सांगा उत्तर सांगा, वंडर्स ऑफ महाराष्ट्र कथाबाह्य कार्यक्रमांसाठी अमोल कोल्हे यांनी निवेदन केले होते. हे कार्यक्रम देखील प्रचंड लोकप्रि झाले होते.
त्याचबरोबर साहेब, रमा माधव, राजमाता जिजाऊ, रंगकर्मी, आघात यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. त्याचबरोबर ऑनड्युटी 24 तास या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली होती. अशा या हरहुन्नरी कलाकाराला लेटेस्टली कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!