Bigg Boss Marathi 2, Episode 96 Preview: बिग बॉसच्या घरात आज शिवानी सुर्वेच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन रंगणार; आरोह, वीणा यांनाही त्यांचा घरातील प्रवास पाहून अश्रू रोखणं झालं कठीण!
Bigg Boss Marathi 2 (Photo credits: Voot)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) चा प्रवास आता अवघ्या काही दिवसांचा बाकी आहे. येत्या 1 सप्टेंबर दिवशी बिग बॉसच्या घरात अंतिम सोहळा रंगणार आहे. काल ( 28 ऑगस्ट) च्या एपिसोडमध्ये नेहा शितोळे, शिव ठाकरे आणि किशोरी शहाणे यांचा मागील 3 महिन्यांचा प्रवास दाखवण्यात आला होता. मागे वळून पाहताना बिग बॉसच्या जर्नीमधील काही क्षण पुन्हा पाहताना या तिघांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. आज ( 29 ऑगस्ट) च्या भागामध्ये बिग बॉस मराठी 2 मधील वीणा जगताप आणि आरोह वेलणकरचा प्रवास रसिकांसोबतच त्यांनाही पाहता येणार आहे.

सहा आठवड्यांपूर्वी बिग बॉस मराठी 2 च्या घरात दुसरा वाईल्ड कार्ड म्हणू आरोह वेलणकर आला आहे. अल्पावधीतच आरोहने देखील रसिकांसोबतच घरातील सदस्यांचे मन जिंकले आहे. बोलघेवड्या स्वभावामुळे त्याने प्रेक्षकांची आणि घरातील सदस्यांची मनं जिंकत टॉप 6 मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. हळव्या स्वभावाच्या आरोहला घरात अनेकदा अश्रू अनावर झाले पण आज त्याचा एव्ही पाहूनही तो पुन्हा भावनाविवश झाला. आरोह पाठोपाठ वीणा जगतापला देखील तिचा घरातील प्रवास पुन्हा पाहण्याची संधी मिळाली आहे. पहा आजच्या भागामध्ये काय होणार?  

शिवानी सुर्वेच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन

शिवानी आणि वीणा जगतापमधील टशन आता अंतिम टप्प्यात पोहचल्यानंतरही सुरू आहे. शिवानीच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन यंदा बिग बॉसच्या घरात झालं. परंपरेनुसार घरातील वडीलधारी व्यक्ती किशोरी शहाणेंनी तिचं औक्षण केलं. त्यानंतर खास घरातील सदस्यांनी कॅरमल पुडिंगच्या स्वरूपात बनवलेला केक कापून बर्थ डे सेलिब्रेट केला. मात्र हा केक वीणा आणि शिवने खाणं टाळल. आता यामगे नेमकं काय कारण होतं? हे आजच्या भागातच पहायला मिळणार आहे.

शिवानी सुर्वे, नेहा शितोळे, वीणा जगताप, शिव ठाकरे, आरोह वेलणकर आणि किशोरी शहाणे वीज हे सदस्य यंदा टॉप 6 असून त्यांच्यामध्ये अंतिम सोहळा रंगणार आहे. 1 सप्टेंबरला हा शानदार सोहळा रंगेल आणि त्यानंतर विजेता जाहीर होणार आहे.