Bigg Boss Marathi 2 Episode 46 Preview: वीणा, रुपाली आणि किशोरी च्या ग्रुपमध्ये फूट, आज रंगणार नॉमिनेशनचा टास्क, कोण होणार सुरक्षित
Veena Jagtap And Kishori Shahane (Photo Credits: Twitter)

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2)  घरात आल्या दिवसापासूनच सदस्यांचे दोन ग्रुप पडले होते. किशोरी, वीणा, रुपाली, पराग यांचा ग्रुप KVRP म्हणून ओळखला जात होता, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये घरातील इतर सर्व सदस्य अशी एक अघोषित फळी आपण मागच्या दीड महिन्यांपासून पहिली होती मात्र यावेळेच्या वीकेंडच्या वार नंतर यातील 'KVRP' ग्रुपमध्ये फूट पडतेय अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली होती. आजच्या (10 जुलै) भागात या चर्चांवर शिक्कमोर्तब होणार आहे. एकच फाईट वातावरण टाईट या टास्क मध्ये वीणा आणि रुपाली या दोघीनींही किशोरी यांचा फोटो पंचिंग बॅगला लावल्यावरून आज या त्रिकुटात भांडणरुपी चर्चा पाहायला मिळेल, याशिवाय आज या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क (Nomination Task) देखील पार पडणार आहे. पहा  आजच्या भागात काय  होणार? 

आजच्या भागात, वीणा रुपाली आणि किशोरी एकत्र बसून त्यांच्या ग्रुप मध्ये आलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्यांच्यात पुढे आरोप प्रत्यारोपाचं वॉर सुरु होतो आणि शेवटी मला तुमच्याशी बोलायचं नाही असं म्हणून किशोरी वेगळ्या होतात, यानंतर वीणा आणि रुपाली यांच्यामध्ये या विषयावरून काहीशी चर्चा होते, हा सगळा प्रकार घडत असताना नेहा, माधव आणि हीनाला यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देते. असे बिग बॉसच्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आले आहे.

याशिवाय, आजच्या भागात नॉमिनेशन टास्क सुद्धा खेळला जाणार आहे यामध्ये थेट नॉमिनेशन ऐवजी दोन टीम पाडून एका खेळाच्या माध्यमातून नॉमिनेशन होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. बिग बॉस कडून स्पर्धकांना त्यांचा फोटो असलले कार्ड देण्यात येईल त्यांना या टास्क मध्ये प्रतिस्पर्ध्याला आपले कार्ड वाचवत स्वतःला सेफ करण्यासाठी तयार करायचे आहे. यात नेहा वीणाला विनंती करताना पाहायला मिळेल तर या आठवड्यात अभिजित केळकर कॅप्टन असल्यामुळे सुरक्षित आहे.