Bigg Boss Marathi 2, Episode 38 Preview: अभिजीत केळकर मुळे शिव आणि हीना मध्ये झाले कडाक्याचे भांडण, काय आहे वादाचे कारण?
Shiv and Heena (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2: भांडणे आणि बिग बॉसचे घर हे जणू समीकरणच बनलं आहे. या घरात रोज काही ना काही कारणावरुन वाद-विवाद होतच असतात. कधी कधी एखाद्या क्षुल्लक कारणावरुन झालेला वादही विकोपाला जाऊन पोहोचतो. 1 जुलै च्या भागात सुरेखा पुणेकर आणि नेहा शितोळे मधील वाद चांगलाच रंगला तसाच आजच्या भागातही शिव (Shiv Thakre) आणि हीना (Heena Panchal) मध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या भांडणाचे कारण वीणा नसून चक्क अभिजीत केळकर ठरला.

झाले असे की, हीना अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) च्या हाताला बँडेज करत आहे, त्यावेळी मस्करीमध्ये शिव ने अभिजीतची खिल्ली उडवली. त्यावर हीनाने तिला घेऊन चिडवले या कारणावरून शिवशी हुज्जत घालायला सुरुवात केली. पाहा व्हिडिओ

यावेळी माधव, वैशाली, नेहा, सुरेखा पुणेकर असे इतर सदस्यही तेथे उपस्थित आहेत. मात्र शिव नेमका असं काय म्हणाला ज्याचा हीना एवढा इश्यू करतेय, हे पाहण्यासाठी आजचा बिग बॉस मराठी 2 चा एपिसोड अवश्य पाहा.