Bigg Boss Marathi 2, 04 August, Episode 71 Preview: अलका कुबल यांनी आपली मैत्रीण किशोरी शहाणे यांना दिल्या खास शुभेच्छा; चुगली ऐकून पुन्हा भडकली शिवानी

सध्या वीकएंडचा डाव चालू असून या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आजच्या भागात मैत्रीदिनी आपणाला किशोरी शहाणे यांना त्यांच्या एका मैत्रिणीने दिलेल्या खास शुभेच्छा पाहायला मिळणार आहेत. ही मैत्रीण आहे आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री अलका कुबल

Bigg Boss Marathi 2, 04 August, Episode 71 Preview: अलका कुबल यांनी आपली मैत्रीण किशोरी शहाणे यांना दिल्या खास शुभेच्छा; चुगली ऐकून पुन्हा भडकली शिवानी
Bigg Boss Marathi 2, 04 August, Episode 71 Preview (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi Season 2) पर्वाचे जवळजवळ 70 दिवस उलटून गेले आहेत. इतके दिवस अनोळखी लोकांसोबत एकत्र राहणे ही फार मोठी गोष्ट आहे. तरी मागच्या पर्वापेक्षा हा सीझन थंड आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या वीकएंडचा डाव चालू असून या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. आजच्या भागात मैत्रीदिनी आपणाला किशोरी शहाणे यांना त्यांच्या एका मैत्रिणीने दिलेल्या खास शुभेच्छा पाहायला मिळणार आहेत. ही मैत्रीण आहे आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री अलका कुबल.

पहा काय म्हणाल्या आहेत अलका कुबल -

नेहमीप्रमाणे आजचा एपिसोडही चुगली बूथमुळे गाजणार असे दिसत आहे. शिवानीला तिच्या चाहत्याने एक चुगली सांगितली आहे. त्यावर तिने परत वीणा आणि शिववर वार केले केले आहेत. शालीतून जोडा मारणे हा प्रकार शिवानीने उत्तमरीत्या आत्मसात केल्याचे दिसते.

पहा काय असेल शिवानीची प्रतिक्रिया -

एकमेकींवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या वीणा आणि हीना आजच्या भागात एका गाण्यावर नृत्याविष्कार सादर करताना दिसणार आहेत. श्रीदेवी यांच्या ‘किसीके हाथ ना आयेगी ये लडकी’ या गाण्यावर दोघी नृत्य करणार आहेत. याच गाण्यावर पुढे वीणा शिवसोबतही डान्स करताना दिसणार आहे. (हेही वाचा: घरातील भांडणाबद्दल बिचुकले, शिव, वीणा आणि हीना ठरले जबाबदार; अशी घेतली महेश मांजरेकरांनी शाळा)

पहा याची झलक –

आजच्या भागात महेश मांजरेकर सदस्यांसोबत एक रावडी खेळही खेळणार आहेत. हा खेळ नक्की काय असेल हे पाहण्यासाठी तुम्हाला आजचा भाग पाहावा लागेल.

(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2019 08:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).