मुंबई: बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता करण ओबेरॉय याचा जामीन अर्ज फेटाळला
Karan Oberoi (Photo Credits: File Photo)

टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय याला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय (Karan Oberoi) याचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. करणवर  बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. तसंच बलात्काराचा व्हिडिओ बनवून करण आपल्याला धमकावत असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले होते. (अभिनेता करण ओबेरॉय 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, एका ज्योतिष महिलेवर बलात्कार केला होता आरोप)

या प्रकरणात करणला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी ठोठवण्यात आली होती. त्यानंतर करण ओबेरॉयने दिंडोशी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

ANI ट्विट:

तक्रार करणारी महिला आणि करण ओबेरॉय हे दोघेही 2016 पासून रिलेशनशीपमध्ये होते. लग्नाचे आश्वासन देत बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

करण ओबेरॉय याने 'जस्सी जैसी कोई नही,' 'स्वाभिमान', 'साया', 'जिंदगी बदल सकता है हादसा' या मालिकांमध्ये काम केले आहे.