अभिनेता करण ओबेरॉय 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, एका ज्योतिष महिलेवर बलात्कार केला होता आरोप
Karan Oberoi (Photo Credit): Twitter

काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या ज्योतिष महिला बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ऑबेरॉयला (Karan Oberoi) अंधेरी कोर्टाने  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावलीआहे. 6 मे ला करणला अटक करण्यात आली होती.

जस्सी जैसी कोई नही, स्वाभिमान, साया, जिंदगी बदल सकता है हादसा या मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेता करण ऑबेरॉयवर एका महिलेवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला होता. त्याप्रकरणी मुंबई ओशिवरा पोलिसांनी त्याला अटकही केली होती. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, करणने बलात्कार केल्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकवत होता.

तसेच तिच्याकडून पैसे उकळले असल्याचे तिने ओशिवारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर करणने मला त्याच्या घरी बोलावून तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने कथित रुपात तिला नारळ पाणी प्यायल्या दिल्यानंतर काही वेळाने ती चक्कर येऊन खाली पडली. त्याचवेळी आरोपीने माझ्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

तर दुसरीकडे अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) आणि सुधांशू पांडे (Sudhanshu Pandey) त्याच्या बाजूने असून हे आरोप खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुधांशू करण सोबत इंडिपॉप 'बँड ऑफ बॉईज' केले आहे.

अभिनेत्री मोना सिंगच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप

करण ऑबेरॉय प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंग हिचा एक्स बॉयफ्रेंड आहे. त्याने 'जस्सी जैसी कोई नहीं' ह्या मालिकेत तिच्यासोबत काम केले होते. जस्सी जैसी कोई नहीं मध्ये करणने मोना सिंगसोबत काम केले होते. येथूनच दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.