
'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शो चे होस्टींग महानायक अमिताभ बच्चन करत आहेत. या शो चा 10 वा सीजन सुरु झाला आहे. आपल्या दमदार आवाजाने आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाने अमिताभ बच्चन प्रेक्षकांची मने जिंकतात. पण या शो साठी बिग बी किती मानधन घेतात माहित आहे का?
सुत्रांनुसार, गेल्या सीजनच्या तुलनेत यंदाच्या सीजनमध्ये बिग बींचे मानधन वाढले आहे. KBC-9 साठी अमिताभ बच्चन यांनी 200 कोटींचे डिल केले होते. एका एपिसोडसाठी ते 2.6 कोटी इतके मानधन घेत होते. पण यंदाच्या सीजनमध्ये ते मानधन वाढवण्यात आले आहे. या सीजनमध्ये प्रत्येक एपिसोडसाठी अमिताभ बच्चन 3 कोटी रुपये इतके मानधन घेत आहेत.
अलिकडेच गुवाहटीच्या बिनिता जैन या 10 व्या सीजनच्या पहिल्या करोडपती झाल्या. आतापर्यंत या सीजनमध्ये सर्वांचा प्रवास 25 लाखांपर्यंत येवून थांबला होता. मुलाचे डेन्टीस्ट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिनिता जैन या बक्षिसाच्या रक्कमेचा वापर करणार आहेत. त्याचबरोबर स्वतःचे एक क्लिनिक सुरु करु समाजसेवा करण्याचे आणि गरीबांच्या मुलांसाठी कोचिंग इंस्टीट्यूड काढण्याचे त्यांचे स्वप्न आहे.