
Sa Re Ga Ma Pa L'il Champs Winner: सारेगामापा लिटिल (Sa Re Ga Ma Pa L'il Champs) च्या ग्रँड फिनालेनंतर अखेर शोच्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी जेटशेन डोहना लामा (Jetshen Dohna Lama) ने लोकप्रिय गायन रिअॅलिटी शोच्या विजेत्याचा मुकूट जिंकला आहे. जेतशेनचे वय फक्त 9 वर्षे आहे. एवढ्या लहान वयात तिने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे आणि अखेर या कामगिरीमुळे जेटशेनने शोची ट्रॉफी जिंकून मोठं यश संपादन केलं आहे.
या संपूर्ण सीझन शोमध्ये शंकर महादेवन (Shankar Mahadevan), अनु मलिक (Anu Malik) आणि नीती मोहन (Neeti Mohan) जजची खुर्ची सांभाळताना दिसले, तर भारती सिंगने शोच्या होस्ट म्हणून सर्वांचे मनोरंजन केले. हर्ष सिकंदर (Harsh Sikandar), रफा यास्मिन (Rafa Yeasmin), अथर्व बक्षी (Atharv Bakshi), अतनु मिश्रा (Atanu Mishra), जेतशेन लामा आणि न्यानेश्वरी घाडगे यांनी जवळपास 3 महिने चाललेल्या या शोमध्ये टॉप 6 मध्ये स्थान मिळवले. काल रात्री, 6 अंतिम स्पर्धकांनी आपल्या परफॉर्मन्सने जज आणि प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, जेटशेन लामाने शोच्या ट्रॉफीवर आपले नाव लिहिले. याशिवाय हर्ष सिकंदर व न्यानेश्वरी घाडगे हे प्रथम व द्वितीय उपविजेते ठरले आहेत. (हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 Winner: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला अक्षय केळकर)
View this post on Instagram
जेटशेनने ट्रॉफीसह 10 लाख रुपये जिंकले आहेत. त्याचवेळी पिंकव्हिलाशी झालेल्या संवादादरम्यान तिने बक्षिसाच्या रकमेबाबतही मोकळेपणाने चर्चा केली. आता या पैशाचे ती काय करणार आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना जेतशेन लामा म्हणाली की, 'शो जिंकल्यानंतर मी खूप आनंदी आहे. मला या पैशातून एक कुत्र्याचे पिल्लू विकत घ्यायचे आहे आणि माझ्या घरी एक स्विमिंग पूल देखील बनवायचा आहे.'
जेतशेन वयाच्या अवघ्या 3 वर्षापासून संगीताशी जोडली गेली आहे. शोचे जज शंकर महादेवन यांनी तिचे नाव 'मिनी सुनिधी चौहान' ठेवले आहे.