Tiger Shroff (Photo Credits-Instagram)

भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) टोक्यो ऑलपिंक 2020 च्या स्पर्धेत देशाला पहिला मेडल जिंकून दिले. त्याचसोबत देशातील काही लोकांसह बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याला सुद्धा मीराबाई चानू हिने प्रेरित केले आहे. मीराबाई चानू आपल्या विजयानंतर शुभेच्छा दिल्या जात आहेत. याच दरम्यान आता अभिनेता टायगर श्रॉफने व्हिडिओ शेअर केला आहे. टायगर श्रॉफ याने इंस्टाग्रामवर वेटलिफ्टिंग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, टायगर श्रॉफ 140 किलो वजनासह स्कॉट्स करत आहे. या व्हिडिओसह टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 140 किलोग्रॅमचे वजन उचलले आहे. त्यानंतर टायगर याने मीराबाई चानू हिचे धन्यवाद सुद्धा मानले आहेत. टोक्यो ऑलंपिक मध्ये तिचे शानदार प्रदर्शन केले.

टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियात सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडिओवर त्याच्या वडीलांनी सुद्धा त्याचे कौतुक केले आहे. टायगर फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. टायगरच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे फिटनेसचे व्हिडिओ सुद्धा युजर्सला नेहमी पाहता येतात.(Project K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

टायगर श्रॉफ याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर तो हिरोपंती 2 मध्ये दिसून येणार आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दिकी सुद्धा झळकणार आहे. याआधी टायगर आणि नवाजुद्दीन मायकल मधून एकत्रित काम करताना दिसून आले होते.