Nitin Kumar Satyapal Singh Dies: गोरेगाव पश्चिम भागातील यशोधम परिसरातील अपार्टमेंटमध्ये 35 वर्षीय अभिनेते नितीन कुमार सत्यपाल सिंह (Nitin Kumar Satyapal Singh) यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. नितीन कुमार सत्यपाल सिंग हे टेलिव्हिजन अभिनेते होते. शुक्रवारी ही घटना समोर आली. नितीन कुमार सत्यपाल सिंग यांचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
सिंग हे गेल्या काही वर्षांपासून नैराश्याने ग्रासलेले होते. मालिका किंवा चित्रपटांमध्ये काम मिळत नसल्याने ते चिंतेतदेखील. त्यासाठी त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. सिंग यांची पत्नी त्यांच्या मुलीला एका उद्यानात घेऊन गेली होती. त्या घरी परत आल्यावर फ्लॅट आतून बंद असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी अनेक वेळा बाहेरून आवाज दिला. (Athiya Shetty Announces Pregnancy: अथिया शेट्टी-केएल राहुल लवकरच होणार आई-बाबा; लग्नाच्या दोन वर्षांत घरी येणार पाहूणा)
मात्र, त्यांना आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस त्यांना फ्लॅटमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांना नितीन कुमार यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांलर नितीन कुमार यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.