Vijaylakshmi (Photo Credits: Instagram)

तमिळ अभिनेत्री विजयलक्ष्मी (Vijayalaxmi) हिच्याबद्दल खूप मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. विजलक्ष्मी ने आपल्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येपूर्वी तिने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करुन आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे असे सांगितले. मी काही टॅबलेट्स खाल्ले असून आत्महत्या करत आहे असे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये तिने असेही सांगितले आहे की, अभिनेता सीमन (Seeman) आणि हरी नाडर (Hari Nadar) चाहते तिला त्रास देत आहेत त्यामुळे त्रस्त होऊन आपण हे पाऊल उचलत आहोत. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

विजयलक्ष्मी फॉलोअर्स च्या त्रासाल फार कंटाळली होती असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विजयलक्ष्मीने या व्हिडिओमध्ये असेही म्हटले होते की, "माझ्या मृत्यूने लोकांचे डोळे उघडतील आणि माझ्या चाहत्यांना विनंती करते की, त्यांनी सीमन आणि हरी नाडरच्या चाहत्यांना सोडू नका."

हेदेखील वाचा- Sushant Singh Rajput Passed Away: सुशांत सिंह राजपूत याच्या खाजगी आयुष्याविषयी '10' खास गोष्टी

या व्हिडिओमध्ये विजयलक्ष्मी म्हणाली आहे की, "हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मागील 4 महिन्यांपासून सीमन आणि त्याच्या पार्टीच्या लोकांनी मला प्रचंड त्रास दिला. माझ्या कुटूंबासाठी जगण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. हरी नाडरद्वारे मिडियामध्ये अपमानास्पद करण्यात आले. काही वेळात माझे बीपी कमी होईल आणि मरेल. माझ्या आईची आणि बहिणीची काळजी घ्या आणि हरी नाडर-सीमन च्या चाहत्यांना सोडू नका."

विजयलक्ष्मी फ्रेंडस्, Boss Engira Bhaskaran and Meesaya Murukku सारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सांगण्यात येत आहे की, ती एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.