
Shah Rukh Khan Turns 57: रोमान्सचा बादशाह शाहरुख खान आज 57 वर्षांचा होत असताना, त्याची मुलगी सुहाना खानने सोशल मीडियावर तिच्या जिवलग मित्रासाठी म्हणजे वडीलांसाठी थ्रोबॅक फोटोसह एक गोड संदेश पोस्ट केला आहे. सुहानाने इंस्टाग्रामवर स्वतःचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यात ती तिचे वडील शाहरुख आणि भाऊ आर्यनसोबत दिसत आहे. सुहाना आणि आर्यन शाहरुखसोबत पोज देताना दिसत आहे. तिने कॅप्शन दिले: "माझ्या सर्वात चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा," "मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते."
पाहा फोटो
झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील दिसणार आहेत.