पाकिस्तान माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांच्या नात्यामधील एका परिवारातील लग्नात काही दिवसांपूर्वी गायक मिका सिंग (Mika Singh) याने परफॉर्मन्स केला होता. त्यानंतर देशभरात मिकाच्या या वागण्यामुळे नागरिकांनी त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला. तसेच ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिऐशन यांनी सुद्धा मिकावर बंदी घातली. मात्र याबबात मिका सिंग याने माफी मागितल्यानंतर त्याच्यावरील बंदी हटवण्यात आली.
दरम्यान बिग बॉस मधील स्पर्धक शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) हिने मिका सिंग याच्या वागण्याचे समर्थन केले आहे. त्याचसोबत पाकिस्तान मध्ये मी सुद्धा आता परफॉर्मन्स करणार असे ओपन चॅलेंज दिले आहे. शिल्पा हिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत मिका सिंग याच्या बाजूने उभी राहिली आहे. तसेच मिका सिंग तुला घाबरण्याची काहीच गरज नाही असे सुद्धा शिल्पा हिने म्हटले आहे. परंतु मिका सिंग याने माफी का मागावी जर त्याने कोणतेच चुकीचे काम केलेले नाही असे सुद्धा शिल्पा हिने मत व्यक्त केले आहे.(पंजाबमध्ये 'राखी सावंत'सोबत छेडछाड; म्हणाली मला मिका सिंगची आठवण आली)
तसेच कोणत्याही प्रकारचे अधिकृत नियम नसून सुद्धा कशामुळे मिका सिंग याने पाकिस्तानात परफॉर्मन्स केल्यानंतर बंदी घालण्यात आली असा सवाल सुद्धा शिल्पा हिने उपस्थित केला आहे. त्याचसोबत अद्याप असा एकही कायदा बनवण्यात आलेला नाही जेणेकरुन तो व्यक्तीला काम करण्यापासून थांबवेल. त्यामुळे आता मी सुद्धा पाकिस्तानात जाऊन परफॉर्मन्स करणार असून बघुया कोण मला थांबणार असे ओपन चॅलेंज तिने दिले आहे. एवढेच नाही जर मी असे केल्यास माझ्यावर कारवाई किंवा अन्य कोणताही निर्णय घेतल्यास त्याचा विरोधात मी लढणार असल्याचे ही शिल्पा शिंदे हिने म्हटले आहे.