राखी सावंत आणि मिका सिंग (Photo Credits: File Photo)

चर्चा आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांचे नाते पाचवीलाच पूजले आहे. प्रत्येकवेळी आपल्या कारानाम्यांनी राखी सतत लोकाच्या चेष्टेचा आणि चर्चेचा विषय ठरते. नुकतेच पुलवामा हल्ल्यावरचे तिचे वक्त्यव्य, ‘गरज पडली तर आपण 2000 बॉम्बसोबत पाकिस्तानमध्ये उडी घेऊ’ अनेक वर्तमानपत्रांची हेडलाईनबनले होते. आता राखीसोबत कोणी छेडछाड केली असल्याची बातमी समोर आली आहे. एका रेसलिंग शो (Wrestling Show) च्या प्रमोशन दरम्यान राखीसोबत काही तरुणांनी छेडछाड केली. राखीने जेव्हा या गोष्टीचा विरोध केला तेव्हा ते तरुण पळून गेले.

तर राखी, पंजाब (Punjab) च्या लुधियाना शहरात द ग्रेट खली (The Great Khali) सोबत ओपन जीपमधून रेसलिंग शोचे प्रमोशन करत होती. तेव्हा अचानक काही तरुण जीपवर चढले आणि त्यांनी राखीसोबत घाणेरड्या हरकती करायला सुरुवात केली. राखीने या गोष्टीचा प्रचंड विरोध केला शेवटी हे तरुण पळून गेले. या घटनेनंतर राखी रडायला लागली आणि म्हणाली आता मी पंजाबमध्ये परत कधीच येणार नाही. ‘पंजाबी लोकांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर होता, मात्र या तरुणांच्या अशा वागण्यामुळे तो आदर निघून गेला. ही घटना घडली त्यावळी मला मिका सिंग (Mika Singh) ची आठवण आली, त्याच्यासारखाच हा तरुण होता. (हेही वाचा: व्हिडीओ : महिला पैलवानने राखी सावंतला जमिनीवर आदळले; जखमी राखी हॉस्पीटलमध्ये भरती)

राखी सावंत आणि द ग्रेट खली यांनी सांगितले की, त्यांना लुधियाना पोलिसांकडून संरक्षण मिळाले नाही. म्हणूनच राखी सावंतसोबत छेडछाड केली गेली. राखीने इशारा दिला आहे की, जर का तिला सुरक्षा मिळत नसेल तर ती या कुस्ती शोमध्ये भाग घेणार नाही.