Shah Rukh Khan Next Project King: शाहरुखने नकळत त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाचा केला खुलासा, लेक सुहानाही असणार चित्रपटाचा भाग (View Pic and Watch Video)
Photo Credit - Instagram

Shah Rukh Khan Next Project King: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने अलीकडेच प्रतिष्ठित कान्स पुरस्कार जिंकल्याबद्दल दिग्दर्शक संतोष सिवन यांचे अभिनंदन करणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला. मात्र, या व्हिडिओमध्ये शाहरुखने नकळत त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाबाबत संकेत दिले आहेत. शाहरुख खानचा पुढचा चित्रपट 'किंग' नावाचा ॲक्शन ड्रामा असेल आणि त्यात त्याची मुलगी सुहाना खानही दिसणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. (हेही वाचा:Top 5 Upcoming Movies 2024: बॉलीवूड आणि साउथचे हे '5' बहुप्रतिक्षित चित्रपट या वर्षी बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, लिस्ट पाहून घ्या )

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हा चित्रपट सुजॉय घोष दिग्दर्शित करणार असून सिद्धार्थ आनंद चित्रपटाचे निर्माते आहेत. तथापि, हे सर्व केवळ अंदाज मानले जात होते. अद्याप कोणतीही अधिकृतता त्यात आली नव्हती. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शाहरुख खान 'किंग' चित्रपटाबाबत बोलता झाला. योगायोग म्हणून त्या चित्रपटाची स्क्रिप्ट त्याच्या टेबलावर दिसली. त्यामुळे शाहरुखचा आगामी चित्रपट हा किंग असेल आणि त्यात सुहनादेखील असणार हे नक्की आहे.

गुपीत उघडलं

किंग चित्रपटात शाहरुख आणि सुहानाची जोडी मोठ्या पडद्यावर काय प्रभाव पाडते हे पाहणे गरजेचे असणार आहे. शाहरुख खान शेवटचा ॲटलीच्या जवान या चित्रपटात दिसला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.