भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून तसेच पोलिसांकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर आसाम पोलिसांचं एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. यात आसाम पोलिसांनी (Assam Police) अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आयकॉनिक पोझचा वापर करत सोशल डिस्टंसिंगचं पालन करण्याचा संदेश दिला आहे.
आसाम पोलिसांनी शाहरूख खानचा आयकॉनिक पोझमधील फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, 'सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं तर नक्कीचं आपण सुरक्षित राहु शकतो. जसं शाहरुख म्हणतो, कभी कभी पास आने के लिए कुछ दूर जाना पडता है, और दूर जाकर पास आने वालों को बाजीगर कहते है. त्यामुळे एकमेकांपासून 6 फुटांचं अंतर ठेवा आणि बाजीगर व्हा.' (हेही वाचा - अभिनेता प्रभास आणि दीपिका पादुकोण ही जोडी प्रथमच ऑनस्क्रीन दिसणार एकत्र, आगामी Sci-Fi चित्रपटाची केली सर्वात मोठी घोषणा)
Social Distancing can save lives.
Or as @iamsrk would say, "Kabhi kabhi paas aaane ke liye kuch door jaana padta hai, aur door jakar paas aane walon ko Baazigar kehte hai."
Stay Six feet apart and be a Baazigar! #SocialDistancing #IndiaFightsCorona pic.twitter.com/m7PLnZRgJW
— Assam Police (@assampolice) July 18, 2020
सध्या सोशल मीडियावर आसाम पोलिसांनी केलेलं हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक ट्विटर यूजर्संनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात मागील 24 तासात कोरोनाचे 38,902 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 77 हजार 618 वर पोहोचली आहे.