लाइव्ह कार्यक्रमादरम्यान गायक 'शान'वर फेकला गेला कागदाचा बोळा; जाणून घ्या काय होते कारण
शान (Photo credits: Shaan/Facebook)

आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने लोकांवर भुरळ पाडणाऱ्या शानला नुकतेच एका वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. आसामच्या गुवाहाटी येथील सरूसजाई स्टेडियममध्ये शानच्या म्युजिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शानने एक बंगाली गाणे गायला सुरुवात केली. हे गाणे प्रेक्षकांना आवडले नसल्याने. प्रेक्षकांकडून दगडफेक करण्यात आली तसेच शानवर कागदाचा बोळा फेकून मारण्यात आला.

इतकचे नाही तर काही श्रोत्यांनी येथील मालमत्तेचेदेखील नुकसान केल आहे. त्यात काही खुर्च्या तोडण्यात आल्या असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबत संतापलेल्या शानने ट्वीट करून नाराजी व्यक्त करत कोणत्याही कलाकारासोबत असे वागणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच ‘प्रत्येक कलाकार हा मेहनतीने पुढे आला असतो. त्यामुळे त्याच्या कलेचा मान राखा. माझी प्रकृती स्थिर नसतानादेखील मी केवळ तुमच्यासाठी येथे आलो आणि तुमच्यासाठीच हा परफॉर्मेस देत होतो. मात्र तुमचा असा रिस्पॉन्स असेल तर मलाही तुमच्या समोर माझी कला सादर करण्यात काही रस नाही’, असेही शान म्हणाला.

शान हा बॉलिवूडमधील दिग्गज गायक असून त्याने आजवर अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यामुळे केल्या गेलेल्या अपमानाबद्दल तर आसाममधील काही नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शानची माफी मागितली आहे.