आपल्या धमाकेदार नृत्याने प्रेक्षकांवर छाप पाडणारी हरियाणीची डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) ही सध्या खुपच चर्चेत आहे. तसेच सपनाचा हटके अंदाज आणि बॉलिवूड मधील तिच्या पदार्पणामुळे तिचे फॅन फॉलोअर्ससुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरम्यान आता सपना हिने एक नवीन खुलासा केला असून मित्रासोबतच्या नात्याला तिने प्रेमाचे नाव दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सपना चौधरी नेहमीच इन्स्टाग्रामवरुन आपले व्हिडिओ पोस्ट करत असते. तसेच सध्या टिक टॉक या अॅपमधूनही सपना तिचा डान्स प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नुकताच एक व्हिडिओ सपना हिने पोस्ट केला असून त्यामध्ये ती तिच्या मित्राला I Love You म्हणत असल्याचे दिसून येत आहे. तिने या मित्राला आपला बॉयफ्रेंड बनवले आहे.(हेही वाचा-सपना चौधरी हिच्या नव्या कारची किंमत ऐकून थक्क व्हाल, चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण)
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवरील सपना हिचा हा व्हिडिओ लोक वारंवार पाहत आहेत. तसेच प्रेक्षकांकडून या व्हिडिओला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर सपना हिने नुकतीच नवीन आलिशान गाडी घेतली असल्याचा ही व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.