सपना चौधरी हिच्या नव्या कारची किंमत ऐकून थक्क व्हाल, चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण
सपना चौधरी (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

हरियाणा मधील नृत्य कलाकार सपना चौधरी (Sapna Chaudhary) ही तिच्या नृत्याविष्काराने सगळ्यांना घायाळ करते. तर सलाम खानचा (Salman Khan) कलर्स वाहिनीवरील शो 'बिग बॉस सीझन 11' नंतर तिची देशभरात प्रसिद्धी झाली. तर सध्या सपना आपल्या आयुष्यात यशाच्या शिखरावर जाऊन पोहली आहे. सपना बद्दल सांगायचे झाले तर तिनी नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

सपना हिने जागतिक महिला दिनाच्या दिवशी स्वत:साठी एक आलिशान कार खरेदी केली आहे. याबाबत इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये सपना कारच्या शोरुम मध्ये दिसून येत आहे.

महिला दिनाचे खास गिफ्ट म्हणून सपनाने एंडेवर ही आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याची सुरुवाती किंमत 25 लाख रुपये आहे. तसेच जर तुम्हाला या कारमध्ये अन्य फिचर्स हवे असल्यास त्या कारची किंमत जवळजवळ 32 लाख रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

New entry in family Endeavor 😘😘👌👌👌 @itssapnachoudhary @karan.mirza #sapnachoudhary #sapnachaudhary

A post shared by Sapna Choudhary (@isapnachaudhary) on

सपना कारची पूजा करताना एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. रियालिटी आणि लाईव्ह शो केल्यानंतर सपना ही सध्या बॉलिवूडमधील चित्रपटातून झळकत आहे. तर नुकताच सपनाचा बॉलिवूडमधील चित्रपट दोस्ती के साईड इफेक्ट्स चा ट्रेलर इंटरनेटर पाहायला मिळाला होता.