Salman Khan Viral Photo: कोट्यावधींचा मालक असला तरी सलमान खान घालतोय फाटलेले शुज; व्हायरल फोटोची चर्चा
Salman Khan Viral photo

Salman Khan Viral Photo: बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटामुळे तर कधी त्याच्या लुकमुळे. सलमान खानचा 'टायगर 3' नुकताच चर्चेत होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. सलमान आणि कॅटरिना या दोघांची कॅमेस्ट्री या चित्रपटातून दिसून येते. सलमान खानच्या फॅशन हे नेहमी चर्चेचा विषय असतो. सलमान खानचे चाहते नेहमीच त्याच्या फॅशनला फॉलो करत असतात.

दरम्यान सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात सलमान खानने जुने आणि फाटलेले शुज परिधान केलं आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी एकीकडे कौतुकंच केल तर दुसरीकडे हा फोटो ट्रोल केला जात आहे.चाहत्यांनी फोटो पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे. तू एक लीजेंड आहेस, सलमान खानसारखा दुसरा कोणीत नाही, 'डाऊन टू अर्थ भाईजान' अशा अनेक कमेंट्स चाहत्याकडून केले जात आहे. तर एकीकडे हा फोटो डिपफेक असल्यासं देखील सांगत आहे. हा फोटो एका कार्यक्रमाचा असल्याचा दिसून येतो.

सलमान खान किक 2', 'बजरंगी भाईजान 2','धाक', 'बुलबुल मॅरिज हाल', 'नो एन्ट्री में एन्ट्री, दबंग 4 या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सलमान खानच्या चाहत्यांना फार उत्सुकता लागली आहे. दरम्यान सलमान खानचा 'टायगर 3' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद देत आहे. सद्या सलमान खान 'बिग बॉस 17' होस्ट करत आहे.