
Sakhee-Suvrat Wedding Mehendi Photos: दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशी (Suvrat Joshi) आणि सखी गोखले (Sakhee Gokhale) ही जोडी आज (11 एप्रिल) दिवशी खर्या आयुष्यात विवाहबंधनात अडकणार आहे. पुण्यामध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये सखी- सुव्रतचा विवाहसोहळा रंगणार आहे. काल रात्री सखीच्या मेहंदीचा कार्यक्रम रंगला. त्याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. पहा सखी सुव्रतच्या लग्नाचे फोटो
सखी- सुव्रतच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो



पुण्यामध्ये सखीसाठी अभिनेत्री सायली संजीव आणि आरती वडगबाळकर यांनी मेहंदी काढली आहे. तर या लग्नासाठी अमेय वाघ, चिन्मयी सुमीत, सुमीत राघवन, पर्ण पेठे, जितेंद्र जोशी आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत.
सखी गोखले ही अभिनेत्री शुभांगी गोखले आणि मोहन गोखले यांची मुलगी आहे. सध्या उच्च शिक्षणासाठी सखी लंडनमध्ये होती. मात्र खास महिन्याभराच्या सुट्टीवर ती भारतामध्ये आली आहे. लग्नानंतर ती पुन्हा लंडनला जाईल.
दिल दोस्ती दुनियादारीच्या सेट्सवर सखी आणि सुव्रतची ओळख झाली. पुढे मैत्री आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर चार वर्षांच्या रिलेशनशीपनंतर आता सखी-सुव्रत विवाहबंधनात अडकणार आहेत.