Sakhi -Suvrat Wedding Photos: दिल दोस्ती दुनियादारी (Dil Dosti Duniyadari) फेम सुजय आणि रेश्मा म्हणजेच सुव्रत जोशी (Suvrat Joshi) आणि सखी गोखले (Sakhee Gokhle) पुण्यात एका खाजगी सोहळ्यात विवाहबंधनात अडकली. दोन्ही कुटुंबाच्या अगदी जवळच्या लोकांच्या, मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. सखी-सुव्रतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करण्यात आले आहेत. Sakhee-Suvrat Wedding: सखी गोखले-सुव्रत जोशी आज बांधणार लगीन गाठ! पहा सखीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो,व्हिडिओ
पहा सखी-सुव्रतच्या लग्नाचे फोटोज
सखी आणि सुव्रतची ओळख दिल दोस्ती दुनियादारी या टीव्ही सिरिअल्सच्या सेटवर झाली. या मालिकेतून दोघेही घराघरात पोहचली. सुव्रत पुढे काही सिनेमांमध्ये झळकला. दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा या मालिकांमध्ये एकत्र काम केल्यानंतर सुव्रत, सखी आणि अमेय वाघ यांनी एकत्र येऊन 'कलाकारखाना' ही निर्मिती संस्था निर्माण केली. सुबक सोबत त्यांनी 'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटक सुरू केले.
अमर फोटो स्टुडिओमध्ये सुव्रत आणि सखी प्रमुख भूमिकेत होते. कालांतराने सखी गोखलेने नाटकामधून ब्रेक घेत लंडनला उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. आता सुट्टी दरम्यान आलेल्या सखीने आज सुव्रतसोबत लगीन गाठ बांधली.